मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने विलास शिंदे यांच्या आईचं निधन

September 12, 2016 2:52 PM0 commentsViews:

Constable vilas shindeसातारा, 12 जुलै : मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे यांच्या आई कलाबाई विठोबा शिंदे यांचे त्यांचा राहत्या घरी निधन झाले आहे त्या 80 वर्षाच्या होत्या. विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यामुळेच आलेल्या अशक्तपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रॅफिक बंदोबस्तात असताना हेल्मेट वरून हटकल्याचा कारणावरून विलास शिंदे यांचावर 23 ऑगस्टला हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर 8 दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर वाई तालुक्यातील शिरगाव या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मात्र हा धक्का सहन न झाल्याने विलास शिंदे यांचा आई कलाबाई यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर गेली 4 दिवस त्यांनी अन्न ही घेत नव्हत्या त्यामुळे आज त्यांचे निधन झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा