‘पाणी अडवा पाणी जिरवा’

September 12, 2016 3:53 PM0 commentsViews:

मराठवाडा तसा गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा चांगला पाऊस झाला.त्याचे प्रतिबिंब औरंगाबादेतील गणपती देखाव्यांमध्ये उमटलं आहे. औरंगाबाद शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठाणनं पाणी बचतीचा सुंदर संदेश आपल्या गणपती देखाव्यात केला आहे. हे मंडळ नेहमी पाणी बचतीचा संदेश देतं. या वर्षी पाऊस पडला आहे. त्यामुळं पाणी आडवा पाणी जिरवा…नाले खोलीकरण रूंदीकरण करा असा सुंदर देखावा तयार केला आहे. देखाव्यात त्यांनी दोन हजार फूट जागेवर ग्रामिण गावाचा देखावा दाखवला आहे आणि पाणी अडवून पालेभाज्याची लागवड करता येते. पाणी अडवल्यानं आपल शिवार हिरवं करता येत असा संदेश दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा