नादखुळा, भारतीय उद्योगपतीने बुर्ज खलिफात घेतले 12 अपार्टमेंट !

September 12, 2016 4:33 PM0 commentsViews:

12 सप्टेंबर : जगातले सर्वात उंच टॉवर असलेल्या बुर्ज खलिफामध्ये एखाद्याचे किती फ्लॅट किंवा अपार्टमेंट असावेत? एक नाही दोन नाही तर एका तब्बल 22 फ्लॅट आहेत. विशेष म्हणजे हे उद्योगपती भारतीय आहेत आणि त्यांचं नाव आहे जॉर्ज व्ही नेरेपरांबिल.

burj_khalifaजॉर्ज हे मुळचे केरळचे आहेत आणि मेकॅनिक म्हणून ते दुबईला गेले. 2006 साली जॉर्ज यांचा एक नातेवाईक जोकिंगला त्यांना म्हणाला की , ह्या बुर्ज खलिफामध्ये तुम्ही प्रवेशही करू शकत नाहीत. हे चॅलेंज म्हणून स्विकारत..जॉर्ज यांनी त्यानंतर काही दिवसातचं..पहिलं अपार्टमेंट घेऊनही टाकले. त्यात राहायलाही लागले.

आता तर त्यांच्या मालकीचे 22 अपार्टमेंट बुर्ज खलिफात आहेत. त्यातले पाच त्यांनी भाड्यानं दिलेत. इतरांसाठी चांगला भाडेकरू शोधतायत. बुर्ज खलिफा ही गल्फमधली सगळ्यात पॉश टॉवर्स आहेत. जगभर ह्या टॉवरची चर्चा असते.  गल्फच्या श्रीमंतीची ते सिम्बॉल आहे. जॉर्ज व्ही नेरेपरांबिल हे 1976 साली दुबईला गेले. सर्वसामान्य परिस्थितीतून वर येत येत आता ते जीईओ ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी कुलिंगचे प्रोडक्टस बनवते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close