सॅमसंगचे ‘गॅलेक्सी नोट 7′ फुटले, कंपनीने परत मागवले

September 12, 2016 5:21 PM0 commentsViews:

.

12 सप्टेंबर : कार कंपनीनं कार्स परत बोलावल्याच्या घटना नवीन नाही. पण फोन परत मागवण्याची घटना पहिल्यांदाच घडलीय. आणि हा कोणता छोटा फोन नाही तर सॅमसंगचा महागडा गॅलेक्सी नोट 7 हा फोन कंपनीनं जगभरातून परत मागवायला सुरूवात केलीय.

सॅमसंगने अलीकडेच मोठा गाजावाजा करत गॅलेक्सी नोट 7 लाँच केला. पण आतापर्यंत गॅलेक्सी नोट 7 च्या 35 फोन्सनं पेट घेतलाय. आतापर्यंत 25 लाख फोन विकले गेले पण आग फक्त 35 फोन्सना लागलीय, असं सॅमसंगनं म्हटलंय. भारतात हा फोन अजून मिळायला सुरुवात झाली नाहीये.

फक्त प्री-ऑर्डर करणं सुरू होतं. आता ती प्रक्रियाही थांबवण्यात आलीय. पण, असं दिसतंय की, जे फोन विकले जातील, त्यात हा प्रॉब्लेम दुरुस्त करूनच मिळेल. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार फक्त बॅटरीमध्ये दोष आहे. अख्ख्या फोनमध्ये नाही. पण यामुळे कंपनीच्या प्रतिमेवर काही प्रमाणात तरी परिणाम झालाय हे नक्की.

 नेमका प्रॉब्लेम काय आहे?

- फोनच्या बॅटरीमध्ये दोष
- चार्जिंग करून काढताना फोन पेट घेतो
- जगभरात अशा 35 घटना घडल्या
- विमानात नोट 7 चार्ज करण्यावर बंदी
- कंपनीनं 25 लाख फोन परत मागवले
- भारतात अजून विक्रीला सुरुवात नाही
- सॅमसंगला 1 अब्ज डॉलर्सचा फटका
- बलाढ्य कंपनीच्या प्रतिमेवर परिणाम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा