आयपीएल फंडिंग रिपोर्ट सादर

April 17, 2010 9:25 AM0 commentsViews: 9

17 एप्रिलइन्कम टॅक्स विभागाने आयपीएलच्या फंडिंगबाबतचा प्राथमिक अहवाल केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला आहे. इन्कम टॅक्स विभाग आयपीएलच्या तपासाची प्रक्रिया आज संपवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इन्कम टॅक्स विभाग आयपीएलच्या सर्व टीम मालकांना पुढील आठवड्यात नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्स विभागाने ललित मोदी यांच्याकडे आयपीएलच्या लिलावाची कागदपत्रे मागितली आहेत. मोदी यांनी त्यातील काही कागदपत्रे दिल्याचे समजते. राहिलेल्या कागदपत्रांसाठी इन्कम टॅक्स विभाग वाट पाहत आहे. दरम्यान परवाच्या तपासाच्या थोड्याच वेळेपूर्वी एक महिला ललित मोदी यांच्या ऑफीसमध्ये लिलावाची कागदपत्रे घेत होती, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे आयटी विभागातील सूत्रांनी सांगितले. मोदींपासून बीसीसीआय दूर हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये बीसीसीआयच्या अधिकार्‍यांची रात्री बैठक झाली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर या भेटीसाठी उपस्थित होते. पण ललित मोदी धर्मशालेत असूनसुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मोदींची थरूर यांच्यावर हल्लाबोलआयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी पुन्हा एकदा शशी थरुर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एक बेनामी कंपनी आयपीएलसाठी त्रासदायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोची टीममधील 4 मालकांशी मी संपर्क साधला आणि इतर चौघे भागधारक कोण आहेत, हे विचारले तेव्हा त्यांनासुद्धा याची माहिती नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. यात काहीतरी चुकीचे होत असल्याचे मला वाटले तेव्हा मी तोंड उघडले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close