राम कदमांचं कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन

September 12, 2016 7:48 PM0 commentsViews:

ram_kadam12 सप्टेंबर : कॉमेडियन कपिल शर्माने मुंबई महापालिकेवर 5 लाखांची लाच घेण्याचा आरोप केला होता. पण लाच मागणार्‍या अधिकार्‍यांची नावं जाहीर केली नव्हती. आज भाजपचे आमदार राम कदम यांनी कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन केलं.

भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात कपिल शर्माच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. राम कदम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. कपिल शर्मा यांनी आरोप लावलेले भ्रष्ट अधिकार्‍यांची नावं देण्यासाठी काही अधिकार्‍यांनी शर्मांची चौकशीही केली होती.

मात्र त्यानंतर आता कपिल शर्मा यांनी मौन कायम ठेवलंय. मात्र शर्मांचे हे आरोप बिनबुडाचे असून कपिल शर्मा गप्प का ?,असा सवाल आमदार राम कदम यांनी शर्मा यांना विचारलाय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कपिलच्या घराबाहेर घोषणाबाजी करत धरणं आंदोलन केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा