राममंदिराला कोणाचाच विरोध नाही – मोहन भागवत

September 13, 2016 9:33 AM0 commentsViews:

13 सप्टेंबर : राम मंदिर आयोध्येमध्येच होणार, मात्र फक्त राजकारण त्याला आडवं येतं आहे, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.

पुणे एमआयटीने दिल्लीत  विदर्भातील संत गुलाबराव महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. यावेळी मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.

mohan-bhagwat_650x400_41424839165

हिंदू मुस्लिमांचे कलह धार्मिक कारणांमुळे नाही, तर राजकारणामुळे होत असल्याचही यावेळी मोहन भागवत म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.

यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘राम मंदिराच्या मुद्द्यावरून कलह होऊच शकत नाही. हिंदू-मुस्लिम संघर्ष राजकारणामुळे उद्भवला आहे. त्यातून स्वत्वहीन राजकारण हटले तर कोणतीच समस्या नाही. तेव्हाही नव्हती आणि आजही नाही’.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा