पंतप्रधान, राष्ट्रपतींनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा

September 13, 2016 10:27 AM0 commentsViews:

Jama masjid

13 सप्टेंबर :  महाराष्ट्रासह देशभरात ईद उल जुहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशातील मुस्लीम बांधवांनी आज सकाळीच ठिकठिकाणी मशिदींमध्ये नमाज अदा केली. तर पंतप्रधान, राष्ट्रपतींनीही बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुस्लिम कुटुंबातील प्रत्येक घरात एका तरी बकऱ्याचा बळी द्यावा अशी परंपरा आहे. इस्लामचे प्रेषित हजरत इब्राहिम हे अल्लाहचे निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला. त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लिमांच्या अंगी यावं म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा सगळ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बकरी ईद साजरी होतेय.

दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गरीब आणि गरजू लोकांना मदत करा असा संदेश बकरी ईदच्या दिवशी दिला आहे. हजरत इब्राहिम यांनी मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या त्यागाची आठवण करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. बंधुभाव, शांतता आणि सद्भावना वाढावी अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना बकरीदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी शांतता आणि सौहार्दाचे तत्व वृद्धींगत होवो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा