थरूर मुद्द्यावर काँग्रेस मवाळ

April 17, 2010 11:02 AM0 commentsViews: 1

17 एप्रिलपरराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या वादाबाबत काँग्रेसने मवाळ भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणात चढउतार होतच असतात, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी थरुर यांच्याबद्दल दिली आहे. परदेश दौर्‍यावरून पंतप्रधान नुकतेच दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी थरुर यांच्याविषयी सुरू असलेल्या वादावर सध्या तरी थेट बोलणे टाळले आहे. पंतप्रधान दौर्‍यावरून आल्यावर थरूर यांच्याबाबत कडक भूमिका घेतली जाईल, अशी चर्चा होती. पण पंतप्रधानांनी सध्या तरी याबाबत सौम्य भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान चौकशी पूर्ण होण्याआधीच शशी थरूर यांना दोषी ठरवू नये, असे केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही म्हटले आहे. शशी थरूर यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

close