आयपीएलमध्ये गुंतवणूक नाही

April 17, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

17 एप्रिलमाझी किंवा माझ्या कुंटुंबीयांची आयपीएलमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. देशात आणि राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मला आयपीएलच्या वादात पडायचे नाही, असे त्या म्हणाल्या. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.आयपीएलला करमाफी का दिली, याचे उत्तर मला माहीत नाही. आयपीएलमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असाही कदाचित संबधित मंत्र्यांनी केला असेल, असे त्या म्हणाल्या.

close