26/11तील अतिरेकी तालिबानशी संबंधित

April 17, 2010 11:52 AM0 commentsViews: 1

17 एप्रिल26/11 च्या हल्ल्यातील अतिरेक्यांचे संबंध तालिबानशी असल्याची माहिती आता पुढे आली आहे. तालिबान्यांचा मुंबई हल्ल्याशी संबंध असल्याचे समोर येत आहे. लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानात ट्रेनिंग देण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. लष्करचा अतिरेकी हेडलीच्या तपासातूनच ही माहिती मिळाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबान, लष्कर ए तोयबा आणि आयएसआय यांनी मिळून या हल्ल्याचा कट रचल्याची शंका व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत 26/11 च्या हल्ल्यात तालिबानचे नाव कधीच आले नव्हते. भारताने पाकिस्तानला दिलेल्या डोसियरमध्येही तालिबानचा उल्लेख नव्हता. अमेरिकेकडून इशारादरम्यान भारतात आणखी अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. भारतात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या अमेरिकी नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशी पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हल्ल्याची जास्त शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

close