धुळ्यात अशोक चव्हाणांसमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी

September 13, 2016 4:45 PM0 commentsViews:

dhule3धुळे, 13 सप्टेंबर : धुळ्यात काँग्रेसमधील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झालीये. गुलमोहोर विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समोरच काँग्रेसचे माजी आमदार द. वा. पाटील आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

धुळ्याच्या गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आले होते. त्यांच्या उपस्थितीत हेमंत देशमुख पक्षप्रवेश करणार होते. यावेळी द.वा.पाटील यांच्या नातूनं रोहिदास पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं रोहिदास पाटील समर्थक चिडले. त्यांनी अशोक चव्हाणासमोरच दवा पाटलांच्या नातूला मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. मात्र, या हाणामारीच्या घटनेमुळे हेंमत देशमुखांच्या काँग्रेस प्रवेशाला वादाचे ग्रहण लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा