मराठा मोर्चांची धग ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

September 13, 2016 5:31 PM0 commentsViews:

maratha_morcha_cm13 सप्टेंबर : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजातर्फे क्रांती मोर्चे काढण्यात येत आहे. या मोर्चाची धग आता ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत पोहोचली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत बैठक बोलावली आहे.

मराठा समाजातर्फ़े राज्यात सुरू असलेली मूक आंदोलने, मोर्चे यावर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षावर भाजपमधील वरिष्ठ आणि मराठा नेते यांची बैठक बोलवली आहे. ज्यावर सद्य
परिस्थितिवर चर्चा, राज्य सरकारवर होणारे परिणाम, जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमी यावर चर्चा होणार आहे. कोपर्डी प्रकरणानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चे काढले जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा