अमृता फडणवीसांचा न्यूयॉर्कमध्ये रॅम्पवॉक

September 13, 2016 3:35 PM0 commentsViews:

13 सप्टेंबर : ऍसिड हल्ला झालेल्या रेशमा कुरेशीनंतर न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये दिसला तो आणखी एक भारतीय चेहारा आणि तो होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा. पुण्याच्या कासा इन्स्टीट्यूट तर्फे त्यांनी हा रॅम्पवॉक केला. मुलींच्या शिक्षणाचा संदेश देण्यासाठी आपण या फॅशनविकमध्ये सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच रॅम्पवर त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसचं डिझाईन हे शेतकर्‍यांच्या मुलींनी तयार केलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा