हसवणार्‍या विदुषकाची जगण्यासाठी संघर्षमय कहाणी !

September 13, 2016 8:06 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 13 सप्टेंबर : लोकांना पोटभर हसवणार्‍या एका विदुषकाच्या वाट्याला कारुण्याचं जगणं आलंय. औरंगाबादमध्ये आलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचा विदुषक जगण्यासाठी संघर्ष करतोय. या विदुषकाची एक किडनी कँन्सरमुळे काढण्यात आलीये. तर दुसरी किडनीही कमजोर झालीये. अशाही अवस्थेत तो लोकांना हसवण्याचां काम करतोय.

jockerहा नुसता चेहरा पाहिल्यावर कुणालाही हसू आवरता येणार नाही…ग्रेट बॉम्बे सर्कसची जान असलेला हे तुळशीदास चौधरी नावाचे विदुषक… गेल्या साठ वर्षांपासून ते लोकांना हसवतायेत. पण या हसवणार्‍या चेहर्‍यामागं एक कारुण्य दडलेलं आहे. तुळशीदास यांंची एक किडनी कँन्सरमुळे काढण्यात आलीये. त्यांना फक्त एकच किडनी आहे. आहे ती किडनीही कमजोर आहे. वयाची बहात्तरी ओलांडलेल्या तुळशीदास यांना आता धावपळ होत नाही. पण हसण्यासाठी जगेन आणि हसवता हसवता मरेन असं ते सहजपणं सांगतात.

तुळशीदास हे फक्त प्रेक्षकांनाच हसवत नाहीत तर ते सर्कशीतल्या कलाकारांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. सर्कशीच्या मालकालाही ते आधारासारखे वाटतात.

सर्कसच्या मालकांनी त्यांना घरीही पाठवलं पण त्यांना रहावलं नाही. आजार अंगावर काढत आजही ते लोकांना हसवण्याचं काम करतात.

रियल लाईफमधील विदुषकाची शोकांतिका सिनेमात दाखवली. आयुष्य खडतर असलं तरी ते किती सहज जगता येऊ शकतं याचा
तुळशीदास जणू आदर्शच ठरलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा