नाशिकमध्ये 9 लाखांच्या मुद्देमालासह शस्त्रसाठा जप्त

September 13, 2016 8:31 PM0 commentsViews:

nsk_434नाशिक, 13 सप्टेंबर : वाढत्या गुन्हेगारी आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त झालाय. यात 7 आरोपींकडून देशी विदेशी बनावटीच्या आठ पिस्तुलं, तलवारी, चॉपर, कोयते जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे आरोपींकडून 9 लाख 22 हजार रुपयांचा रोख मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय.

शहरातील पंचवटी पोलीस,म्हसरुळ पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी केलेल्या कारवाईतून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. विविध गुन्ह्यात वापरासाठी शहरात दाखल झालेला हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केल्याचं सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे ही शस्त्र कुठल्या राज्यातून दाखल झाली आहेत याचा देखील पोलीस तपास करीत असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा