ईडन गार्डनवर आज कोलकात्याला संधी

April 17, 2010 12:25 PM0 commentsViews:

17 एप्रिलईडन गार्डनवर आज मॅच रंगणार आहे ती कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. सेमी फायनलला जाण्यासाठी दोन्ही टीमसाठी आजची मॅच जिंकणे गरजेचे आहे.आजची मॅच जिंकल्यावर टीमला सेमी फायनलला जाण्यासाठी संधी आहे. त्यामुळे कॅप्टन सौरव गांगुली आणि त्याच्या टीमला आजच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कोलकाता पॉईंट टेबलमध्ये 10 पॉईंटसह सातव्या क्रमांकावर आहे. आणि त्यांना अजून दोन मॅच खेळायच्या आहेत. त्यामुळे विजयासह रन रेट वाढवण्याची त्यांना संधी आहे. दुसरीकडे राजस्थानसाठी मार्ग थोडा कठीणच असणार आहे. ते पॉईंट टेबलमध्ये 12 पॉईंटसह सहाव्या स्थानावर आहेत.पण लीगमधील त्यांची ही शेवटची मॅच आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने केकेआरवर विजय मिळवावा लागणार आहे.स्पर्धेमध्ये टीमसाठी आव्हाने असतील. साहजिकच ही मॅच जबरदस्त चुरशीची होणार हे नक्की.

close