मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक -दानवे

September 13, 2016 11:12 PM1 commentViews:

13 सप्टेंबर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सांगितलं. तसंच या मुद्यावर इतरांशीही बोलण्यास सरकार तयार असल्याचं दानवेंनी म्हटलंय.danve343

मराठा समाजातर्फ़े राज्यात सुरू असलेली मूक आंदोलने, मोर्चे यावर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षावर भाजपमधील वरिष्ठ आणि मराठा नेते यांची बैठक बोलवली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह, विनोद तावडे, सुभाष देशमुख यांच्यासह वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते.

या बैठकीत मराठा मोर्चावर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाने या मोर्च्याच्या निमित्ताने अॅट्राॅसिटी कायद्यात बदल करावे अशी मागणी केलीये. या मागणीबद्दल राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतलीये. त्यामुळे थोडक्यात लाखांच्या वर निघत असलेल्या मराठांच्या मोर्चांची आता सरकारनेही दखल घेतल्याचं स्पष्ट होतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ramdas Padale

    बहुसंख्य मराठा समाज हा शेती करतात. पण या आंदोलनात शेती व्यवसायाासंबधी बाबीशी निगडीत साेयी सवलती बाबत न माेर्चेकरी मागणी करताहेत. ना त्यांचे नेते.. केारडवाहु शेतीचे बागायतीत रूपांतर व्हावे. त्या साठी ⛽ ईंधन विहिरी शेततळे नद्या जाेडणी इत्यादी सुविधा शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत शासकीय मनुष्यबळ वापरून माेफत ऊपलब्ध करून द्यावे. शेतीसाठी वीज माेफत द्यावी ईस्रायली तंत्रज्ञान प्रत्येक शेतापर्यंत पेाहचलाे. शेतमालाची खरेदी शेतकऱ्याचा शेतावरच व्हावी. खरेदी आणि वितरणा साठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. शेतकऱ्याचा मुलांसाठी शेती विषयक ऊद्याेग शासकीय खर्चाने निर्माण करून त्यांना चालविण्यास द्यावे. अशा प्रकारच्या मागण्यांची सदर आंदोलनास जाेड हवी हाती. परंतु एवढी मोठी शक्ती फक्त आरक्षणाच्या मुद्यावरच खर्च हाेत आहे हे दुर्दैव.
    आरक्षण मागणी साेबत शेती व्यवसाय संबंधित मागण्या चीहि जाेड हवी होती असे वाटते