डोंबिवलीत कॉलेज तरुणीची लुटारूशी झुंज

September 14, 2016 8:42 AM0 commentsViews:

DOMBIVLI GIRL

14 सप्टेंबर :  खंबाळपाडा रोडला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका धाडसी कॉलेज तरुणीने लुटारूशी झुंज दिली. कॉलेजमधून परीक्षेचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीने केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे लुटारूने तिच्यावर ब्लेडने वार केला. जखमी झालेल्या विद्यार्थिनीकडील नकली दागिने आणि परीक्षेचा निकाल घेऊन लुटारू पसार झाला.

खंबाळपाड्यातील मॉडेल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने 6 महिन्यांपूर्वी बीएमएसची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल घेऊन स्वरा खंबाळपाडा रोडने चालत घरी परतत होती. इतक्यात चेहरा काळ्या रूमालाने झाकलेला एकजण दुचाकीवरून स्वराजवळ आला. त्याने तिच्या गळ्यातील साखळी खेचुन पळण्याचा प्रयत्न केला; परंतु तरुणीने जोरदार प्रतिकार केला. ही झटापट जवळपास बराच वेळ सुरू होती. अखेर आपण पकडलं जाऊ या भितीमुळे लुटारूनं तरुणीवर ब्लेडनं जोरदार वार केला. अनेक वार झेलल्यानंतर अखेर तिचा धीर सुटला आणि हे लुटारू दागिने चोरून नेण्यात यशस्वी ठरला. सुदैवाने हे दागिने खोटे होते. मात्र तिच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा