स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन सुरू

April 17, 2010 2:23 PM0 commentsViews: 5

17 एप्रिलस्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थांसाठी पर्वणी ठरणारे पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यात सुरू झाले आहे. पुण्यात ग्रंथदिंडी काढून या संमेलनाची सुरुवात झाली. दोन दिवस चालणार्‍या या संमेलनाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील. पुण्याच्या न्यू- इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्टडी सर्कल'ने या संमेलनाचे आयोजन केले आहे. तर 'आयबीएन-लोकमत' संमेलनाचा मीडिया पार्टनर आहे. स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तकेही इथे सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

close