चिन्नास्वामी स्टेडियमवर स्फोट

April 17, 2010 2:40 PM0 commentsViews: 3

17 एप्रिलआयपीएलमधील बंगळुरू आणि मुंबई टीममध्ये होणार्‍या मॅचच्या पाऊण तास अगोदर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्फोट झाला. या स्फोटात 11जण जखमी झाले. यात 4 पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. स्टेडियममधील गेट नंबर 12 जवळच्या जनरेटर रूममध्ये हा स्फोट झाला. ही स्फोटके एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आली होती. हा स्फोट 'मायनर' असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण स्फोटामुळे प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली होती. स्फोटामुळे मॅच उशिराने सुरू झाली. स्फोटाबाबत गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून माहिती मागवली आहे.दरम्यान कोलकात्यातही हाय ऍलर्ट देण्यात आला आहे.

close