आंबा निर्यातीसाठी कार्गो विमानसेवेची गरज

April 17, 2010 2:51 PM0 commentsViews: 9

17 एप्रिलफळांचा राजा असणार्‍या आंब्याने विदेशी बाजारपेठ काबीज केली आहे. पण भारतातील उत्पादनाच्या प्रमाणात आंब्याची निर्यात होत नाही.जहाज प्रवासाला लागणारा वेळ आणि विमानात उपलब्ध होणारी कमी जागा यामुळे आंब्याच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आंब्याच्या सीझनमध्ये आंबा निर्यातीसाठी कार्गो विमानसेवा सुरू करावी अशी मागणी आंबा निर्यातदारांकडून होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला आंब्याच्या 80 हजार पेट्यांची आवक होते. आणि त्यापैकी 50 टक्के आंब्यांची निर्यात होते. ही निर्यात मुख्यत्वे आखाती देश तसेच अमेरिका आणि युरोपात होते. आंब्याच्या निर्यातीमधून 170 कोटी रूपयांचे परकीय चलन मिळते. म्हणूनच आंबानिर्यातीसाठी कार्गो विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

close