पानसरे हत्येप्रकरणी आशा ठक्कर, सनातन महिला साधकाची चौकशी

September 14, 2016 5:57 PM0 commentsViews:

14 सप्टेंबर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजही दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात आली आहे. गोव्यातून आशा ठक्करला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून औषधांच्या साठ्याप्रकरणी डॉ. आशा ठक्करची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. सनातनची महिला साधकही एसआयटीच्या ताब्यात आहे. विरेंद्र तावडेनं दिलेल्या माहितीवरुन तपास सुरू असून सध्या विरेंद्र तावडे एसआयटीच्या ताब्यात आहे.pansare new

पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक विरेंद्र तावडेला अटक झाल्यानंतर पनवेलमधील सनातनच्या आश्रमावर धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी एच आणि एच1 प्रकारातील औषधं सापडल्य़ामुळे खळबळ उडाली असतानाच आता गोव्यातल्या सनातन संस्थेच्या आश्रमातून डॉ. आशा ठक्कर हिला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडं कसून चौकशी सुरू आहे.

गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ठक्कर ही सनातन संस्थेच्या आश्रमात वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती आयबीएन लोकमतला सुत्रांनी दिलीय. तर सातारा जिल्ह्यातील सनातनचा फरार साधक विनय पवारची पत्नी श्रद्धा पवार हिच्याकडंही एसआयटीच्या अधिकार्‍यांकडून कसून चौकशी सुरू आहे.

या सगळ्या घडामोडींबाबत कमालीची गुप्तता पोलिसांनी पाळली असून विरेंद्र तावडेची पोलीस कोठडी असून 2 दिवस शिल्लक असल्यामुळे अजून काय काय माहितीसमोर येते. याकडं आता पुरोगामी चळवळीचं आणि संघटनांचं लक्ष आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा