…तर अॅट्रॉसिटीची गरज नाही,आठवलेंचा मराठा मोर्चेकरांना सल्ला

September 14, 2016 10:43 PM2 commentsViews:

ramdas_athavale324214 सप्टेंबर : सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले नेतेच मराठा समाजाला भडकावत असून,मराठा समाजाने दलितांवरचे अत्याचार थांबवावे म्हणजे ऍट्रॉसिटीची गरज भासणार नाही असा सल्ला केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवलेंनी मराठा समाजाला दिलाय.

राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी मराठा समाजाने केली आहे. यावर दलितांनी मराठ्यांच्या मोर्च्यांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढू नयेत असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. दलित आणि मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचे संघाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला होता.

या निमित्ताने रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी मोर्चे निघणारच असं आठवले यांनी स्पष्ट केलंय. शिवाय दलितांना संघ भडकावत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप सुद्धा आठवलेंनी फेटाळलाय. याआधीही रामदास आठवले यांनी कितीही मोर्चे निघाले तरी अॅट्राॅसिटी कायदा रद्द होणार नाही अशी ठाम भूमिका मांडली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Nishikant Fadat

    आठवले साहेब तुमचा खुप आदर करतो. पण तुम्हाला एक सागु का मराठा मुक अंदोलन ही आंबेडकर समाजा विरुद्ध नाही .आणी तुम्ही जे बोलला ना की मराठा ची सत्ता आता पाच वर्ष नाही येणार . एक सगतो रावसाहेब पाटील दानवे पण एक मराठा आहे .आजुन खुप मोठया व्यक्ति आहे जे मराठा समाजचे आहे .आणी आम्ही सरकार विरुद्ध लढत अहो . आणी तोंड आहे म्हणुन काही पण नका बोलत जाऊ कारण तुम्ही एक नेते आहे आणी तुम्ही जे बोलता तेचा फरक पडतो रीकामे भाषण देत नका जाउ . नाही तर आम्हाला तुम्हाला विरोध करवा लागेल ते पण हिंसक . आणी हे आंदोलन राजकारणाचा भाग नका बनऊ… निशीकांत फदाट

  • abhijeet

    Are atrocity act band whayalach hava…… Atyachar tar te kartayt…….,,….. Mi examples pahilet ki chotya vadala dekhil he dalit lok jativachak shivigalachi case takun marathyana adkavtat… Mi swata pahilay……