कोर्टाच्या आवारातच वकिलांचे सेलिब्रेशन

April 17, 2010 2:54 PM0 commentsViews: 3

17 एप्रिलहायकोर्ट बार असोशिएशनच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कोर्टाच्या आवारातच सेलिब्रेशन केल्याची घटना नागपुरात घडली. यावेळी वकिलांनी कोर्ट परिसरात फटाके फोडले, गुलाल उधळला. तर काहींनी शँम्पेन फोडून हा आनंद साजरा केला. आपण कोर्ट परिसरात कायद्याचे उल्लंघन करत आहेत, याचे भानही या वकील मंडळींना राहिले नव्हते.हायकोर्ट बार असोशिएशनच्या निवडणुकीत अनिल मार्डीकर अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर कोर्टाच्या आवारात हे सेलिब्रेशन पाहायला मिळाले.

close