मुंबई-पुण्यात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट

September 15, 2016 8:24 AM0 commentsViews:

ganpati bisas

15 सप्टेंबर :  लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसोबतचं वरूणराजाने हजेरी लावली आहे. मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे.

बाप्पाला निरोप देताना वरुणराजाला अश्‌्ा्रू अनावर झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे. तर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा