सांगली महापालिकेचा राजदंड तोडला

April 17, 2010 2:57 PM0 commentsViews: 110

17 एप्रिलसांगली महानगरपालिकेच्या आमसभेत विरोधकांनी राजदंड तोडल्याची घटना घडली आहे. मोनोरेलच्या योजनेवर आमसभेत चर्चा होणार होती. पण चर्चेसाठी विषय आल्यानंतर लगेचच महापौरांनी योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठासमोर जमले. आणि त्यांनी महापौरांच्या समोरचा राजदंड उचलला. लगेचच विकास महाआघाडीचे नगरसेवक तिथे धावले आणि या दोन्ही नगरसेवकांच्या झटापटीत राजदंड तुटला.या सगळ्या गोंधळानंतर आमसभा गुंडाळण्यात आली.

close