रामोशी वतन जागेची खडसेंकडून पाहणी

April 17, 2010 3:04 PM0 commentsViews: 22

17 एप्रिलपुण्यातील रामोशी वतन जागेची विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पाहणी केली. पुण्यातील सेनापती रोड येथील रामोशी वतनाची 102 एकरची जागा तत्कालीन महसूलमंत्री अशोक चव्हाण यांनी बिल्डरांच्या घशात घातली. तसेच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी अधिवेशनादरम्यान केला होता. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आज या जागेला भेट दिल्यानंतर ही जागा पूर्वीच्या मालकाच्या नावावर करण्याची मागणी खडसेंनी केली.यावेळी खडसेंसोबत भाजप आमदार देवेंद्र फडणवीस होते.

close