लातूरच्या कोटलवारांची कोटी उड्डाणे

April 17, 2010 3:08 PM0 commentsViews: 1

17 एप्रिलआयपीएलच्या कोची संघात कोट्यवधी रुपये गुंतवणार्‍यांची धनाढ्यांची नावे समोर येत आहेत. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ते म्हणजे लातूरचे कोटलवार कुटुंबीय. या कुटुंबातील हेमंत कोटलवार आहेत, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी. तर त्यांचे बंधू जयंत कोटलवार आहे, अमिरेकेत सॉफ्टवेअर इंजीनियर. आणि त्यांनी आयपीएलमध्ये दीडशे नव्हे फक्त दीड कोटी रुपयेच गुंतवल्याची माहिती त्यांचे वडील हर्षवर्धन कोटलवार यांनी दिली आहे. ते स्वत: लातूरमधील दयानंद महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे माजी प्राचार्य आहेत. हेमंत केवळ परराष्ट्र मंत्रालयात नोकरीला असल्याने त्याचा शशी थरुर यांच्याशी संबंध जोडला जात आहे. खरे तर गुंतवणुकीच्या बाबतीत त्याचा थरूर यांच्याशी काहीही संबंध नाही, असेही ते स्पष्ट करतात. तर जयंतने भारतसोबतच ब्राझीलमध्येही गुंतवणूक केल्याचे ते सांगतात.

close