पुण्यात नणंद-भावजयीची हत्या

April 17, 2010 3:15 PM0 commentsViews: 5

17 एप्रिलपुण्यात आज झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडवली आहे. कर्वेनगर भागातील शाकंभरी या बंगल्यात नणंद भावजय असलेल्या दोन महिलांचा खून झाला आहे. नीता पत्की (वय 52) आणि सुलभा पत्की (वय 60) असे त्यांचे नाव आहे. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले आहेत. स्मिता पत्की यांचे पती प्रभाकर हे मुंबईत सारस्वत बँकेत नोकरी करतात. या दोघीच पुण्यातील बंगल्यात राहत होत्या. हत्याकांडामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.

close