पुण्यातील महिला अधिकार्‍यावर बलात्कार

April 17, 2010 4:01 PM0 commentsViews: 8

17 एप्रिलपुण्यात नुकत्याच सामुहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. आता पुण्यातील एका महिला अधिकार्‍यावर बलात्कार झाल्याची घटना आष्टी-अहमदनगर रस्त्यावर घडली आहे. पुणे इथे राहणार्‍या या महिला अधिकारी आपल्या पतीसोबत परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन परतत होत्या. यादरम्यान आष्टी-अहमदनगर रस्त्यावर त्यांची इंडिका गाडी अडवून लूटमार करण्यात आली. 10 एप्रिलला ही घटना घडली. याबाबत आंबोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आंबोरा पोलिसांनी अहमदनगर येथील कुख्यात गुंड दीपक जावळे याच्यासह चार जणांना अटक केली. या आरोपींनी लूटमारीची कबुली देताना या महिला अधिकार्‍यावर बलात्कार केल्याचीही कबुली दिली. घटना घडून सहा दिवस उलटल्यानंतर चारही आरोपींनी बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवालातही निष्पन्न झाले. जावळेवर याआधी चोर्‍या, दरोडे आणि व्यापार्‍यांना लुटण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या सराईत गुन्हेगारांना जामीन मिळू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. पुण्यापाठोपाठ बलात्काराच्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण माध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

close