गणेश विसर्जनाला दुर्घटनांचे गालबोट, राज्यभरात 15 जणांचा मृत्यू

September 15, 2016 10:54 PM0 commentsViews:

15 सप्टेंबर : गणेश विसर्जनाला दुर्घटनांचं गालबोट लागलं. वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यभरात 15 जणांचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये 7 जण, जळगावमध्ये 2 तर वर्ध्यामध्ये 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय. तर दुसरीकडे अमरावतीत 3 तरुणाचा बुडून मृत्यू झालाय.drowning

राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. मात्र, या विसर्जनाला दुर्घटनेचं गालबोट लागले असून गणेशभक्तांवर काळाले घाला घातला आहे. नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जन करतांना वेगवेगळ्या घटनांत 7 जणांनी जीव गमावला आहे.
सिन्नरमध्ये बंधार्‍यात उतलेल्या रामेश्वर शिरसाठ,संदीप शिरसाठ या दोन तरुणाचा मृत्यू झालाय. तर वाडीवरेत निलेश पाटील या युवकाचा बुडून मृत्यू झाला. त्रंबकेश्वरमध्ये भूषण कसबे या युवकाचा मृत्यू झालाय. तर मालेगावमध्ये सुमित पवार या 14 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झालाय. पिंपळदमध्ये अमोल पाटील तर गंगापूरमध्ये रोशन साळवे या युवकाचा बुडून मृत्यू झालाय.

अमरावती जिल्हामध्ये वेगवेगळ्या घटनेत तीन युवकांचा बूडून मृत्यू झालाय. यामध्ये वरुड तालुक्यात दोन घटनामध्ये दोन युवकाचा तर चिखलदर्‍यात एका आदिवासी युवकाचा बूडून मृत्यू झाला. तर परवाड्यात विसर्जनाहून परतणार्‍या ऑटोला ट्रकने धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहे.

तर जळगाव जामनेरमध्ये गणेश विसर्जन प्रसंगी 2 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. एकाचा मृतदेह सापडला असून दुसर्‍या तरुणाचा मृतदेह शोधकार्य सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा