शिजलेल्या डाळीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

September 15, 2016 11:29 PM0 commentsViews:

nagpur_girl15 सप्टेंबर : नागपुरात गणपती मंडळाच्या महाप्रसादाला गालबोट लागल्याची घटना घडलीय. शिजलेल्या डाळीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या प्रिया मुहुर्ले या चिमुकलीचा मृत्यू झालाय.

उत्तर नागपुरातील बुद्धनगर येथे गणपती मंडळाचा मंगळवारी महाप्रसाद होता. महाप्रसादाचा स्वयंपाक जवळच्याच एका घरी सुरू होता. दरम्यान प्रिया आणि इतर मुलं त्या ठिकाणी खेळत होती. खेळता खेळता तोल गेल्यानं प्रिया शिजलेल्या डाळीच्या भांड्यात पडली. त्यात ती प्रचंड भाजली. जवळच्या लोकांनी लागलीच तिला काढून रूग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला. तसंच गणपती उत्सवावरही विरजन पडलं. महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मंडळाचे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा