जेटप्रश्नी मनसेचं आंदोलन तूर्तास मागे

October 16, 2008 2:22 PM0 commentsViews: 6

16 ऑक्टोंबर, मुंबईजेट प्रशासनाने केलेल्या नोकरकपातीच्या निर्णयामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मनसेनं हा प्रश्न हाती घेतला आहे. जेटच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते आज मुंबईतल्या जेट एअरवेजच्या ऑफिसमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी याप्रश्नावर दूरध्वनीवर चर्चा केली. कर्मचार्‍यांचा प्रश्न हाती घेऊन हातात कार्यकर्ते मनसेचे झेंडे घेऊन कर्मचार्‍यांच्या बरोबरीनं ते गेटबाहेर जमले होते. पगारात 5 ते 10 टक्के कपात करावी आणि या कर्मचार्‍यांना नौकरीत सामावून घ्यावं,अशी मनसेची मागणी आहे. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही कपात कायम करावी आणि कंपनीची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांना पूर्वीप्रमाणे नियमित पगार देण्यात यावा,असा प्रस्ताव मनसेनं जेटसमोर ठेवला आहे. मनसेचे कार्यकर्ते आणि जेटचे कार्यकर्ते याठिकाणी एकत्र आले होते. दंगल नियंत्रण पथक याठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. मनसे आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनही जेटला पत्र दिलंय. कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात यावं,अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. दरम्यान, दोन दिवसांत या प्रश्नावर बैठक घेतली जाईल, असं आश्वासन नरेश गोयल यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. तूर्तास मनसेनं हे आंदोलन स्थगित केलं आहे.

close