सुमित्रा बॅनर्जी यांना लाच घेताना अटक

April 17, 2010 4:55 PM0 commentsViews: 1

17 एप्रिलइन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त सुमित्रा बॅनर्जी आणि त्यांच्या पतीला दीड कोटी रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एका टॅक्स प्रकरणी तडजोड करण्यासाठी ही लाच घेतली जात होती. ठाण्यातील एका बिल्डरचा 25 कोटींचा टॅक्स माफ करून देण्यासाठी सुमित्रा बॅनर्जी आणि असिस्टंट कमिशनर असलेल्या अंजली बांबरे या दोन अधिकार्‍यांनी दोन कोटी रुपये मागितले होते. दीड कोटी रुपयांचा टॅक्स भरायला बिल्डरला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे बिल्डरने दीड कोटी रुपयांचा टॅक्स भरला. आणि 10-10 लाखांची रक्कम 2 वेळा या अधिकार्‍यांना याआधीच दिली होती. तर काल दीड कोटी रुपये या अधिकार्‍यांना दिले जाणार होते. ही माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी सापळा रचून सुमित्रा बॅनजीर्ंना पकडले.सेशन कोर्टाने या 27 एप्रिलपर्यंत सीबीआय कस्टडी देण्यात आली. तर अंजली बांबरेंना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.

close