प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित आणि डाव्या संघटना एकवटल्या

September 16, 2016 12:56 PM0 commentsViews:

Prakash ambedkar

16 सप्टेंबर :  देशभरात गेल्या काही दिवसात झालेले दलितांवरील अत्याचार थांबावेत यासाठी दलित आणि डाव्या संघटनांनी दिल्लीच्या संसद मार्गावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. दलितांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी या दलित स्वाभिमान आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

रोहित वेमुलाची आत्महत्या, गुजरातमधील उनामध्ये दलितांना झालेली मारहाण या पार्श्वभूमीवर देशात दलितांना स्वाभिमानाने जगणं अशक्य झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हे चित्र बदलावं यासाठी प्रकाश अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत दलित, आदिवासी आणि डाव्या संघटनांनी हे आंदोलन पुकारलं आहे. हे आंदोलन 2018 पर्यंत चालणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, माकपचे सीताराम येचुरी, रोहित वेमुलाची आई आणि दलित आणि डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणारेत. या मोर्चाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा