व्यापार्‍याचे सव्वादोन कोटी लुटले

April 17, 2010 5:57 PM0 commentsViews: 3

17 एप्रिलवाशीतील युनियन बँकमधून 2 कोटी 25 लाख रुपये घेऊन जाण्यार्‍या एका व्यापार्‍याला सायन-पनवेल हायवेवर सानपाडा इथे भर दिवसा लुटण्यात आले. मोहम्मद कुरेशी असे या व्यापार्‍याचे नाव आहे. होंडा सिटी कारमधून जाणार्‍या या व्यापार्‍याच्या मागावर तवेरा गाडीतून आलेले चौघेजण पाळत ठेवून होते. वाशीजवळ सानपाडा इथे येताच या टोळीने कुरेशींना थांबवले. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच चॉपरचा धाक दाखवून त्यांच्याकडूल सर्व रक्कम लुटली. कुरेशी ही रक्कम घेऊन तुर्भे येथील आपल्या स्टोअरेजकडे निघाले होते.

close