स्मशानभूमीअभावी तब्बल सहा तास मृतदेह रस्त्यावर पडून !

September 16, 2016 5:48 PM0 commentsViews:

बुलडाणा, 16 सप्टेंबर : पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात एका दलित महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याची लाजिरवाणी घटना बुलडाण्यात घडलीये. स्मशानभूमीअभावी एका दलित महिलेचा मृतदेह तब्बल सहा तास रस्त्यावर पडून होता.buldhana_452

बुलडाण्यातल्या वरवट बकाल गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाहीये. गेल्या 70 वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा द्यावी अशी मागणी होत आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलनंही झाली. परंतु, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. अलीकडेच प्रशासनाकडून 7 दिवसांच्या आत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन देऊन बोलवणं केली.पण अद्याप काही जागा मिळालेली नाही.

त्यामुळे दलितांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची मोठी अडचण होते. सरस्वती इंगळे या महिलेच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न होता. स्मशानभूमीच्या प्रश्नाकडं लक्ष वेधण्यासाठी गावकर्‍यांनी सरस्वती इंगळेंचा मृतदेह रस्त्यावरच आणून ठेवला. जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन जागा देत नाही तोपर्यत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा