सावरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, विखे पाटलांची मागणी

September 16, 2016 6:06 PM0 commentsViews:

16 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील कुपोषित बालक प्रकरणी वादग्रस्त विधान करणार्‍या सावरांना आवरण्याची गरज असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सावरांनी आजपर्यंत आदिवासींच्या कल्याणापेक्षा फक्त विभागाचे अधिकारी आणि आपले स्वतःचे कल्याण केल्याचा घणाघाती आरोप विखे पाटील यांनी केलाय.vikhe_patil_43

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या विष्णू सावरा यांच्या मतदार संघातच कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना अशा प्रकारे असंवेदनशील वक्तव्य करणार्‍या आदिवासी विकास मंत्री सावरांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सावरांच्या वक्तव्याचा खुलासा घेण्या ऐवजी कुपोषण का वाढले याचा खुलासा घ्यावा अशी मागणीही विखे पाटलांनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून हटवणे चुकीचे असून दोषी असलेल्या मंत्र्यांवर कारवाई केली नाही. मात्र, खडसेंवर केवळ आरोप असताना मंत्रिपदावरून हटवणे योग्य नसल्याचं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडसेंची पाठराखण केली आहे. इतर मंत्र्यांचे भ्रष्टाचार समोर आले तरी कारवाई नाही. मात्र, खडसेंवर फक्त आरोप तरीही मंत्रिपदावरून हटवले मुख्यमंत्र्यांचा हा प्रकार म्हणजे खडसेंना एक न्याय आणि आपल्या बगलबच्यांना एक न्याय असा प्रकार असल्याची टीका विखे पाटील यांनी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा