सोलापूर महापालिकेत तोडफोड

April 17, 2010 6:02 PM0 commentsViews: 1

17 एप्रिलसोलापूरकरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत तोडफोड केली. काही आंदोलनकर्त्यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांच्या तोंडाला काळेही फासले. सोलापुरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली कॉलराची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही.भाजप कार्यकर्त्यांनी याच प्रश्नावर महानगरपालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्तांनी त्यांना लवकर भेट दिली नाही.शेवटी संतापलेल्या बीजेपीच्या या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनातील कुंड्यांची तोडफोड केली. कॉलर्‍याच्या साथीमुळे मागील दोन महिन्यात 20 नागरिकांचा बळी गेला आहे.

close