मला हटवून प्रश्न सुटणार नाहीत?, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

September 16, 2016 10:16 PM0 commentsViews:

 

16 सप्टेंबर : प्रस्थापित मराठा नेत्यांविरोधात विस्थापित मराठा समाजाचा मोर्चा असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सह्याद्री वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच मराठा मोर्चांचं विश्लेषण केलं. मराठा समाजातले नेते मोठे झाले पण सामान्य मराठा माणूस तिथंच राहिला. हा माणूस आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय हा मोर्चा सरकारविरोधात नसल्याचा दावाही त्यांनी केलाय.cm_on_maratha333

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात ठिकठिकाणी लाखोच्या संख्येनं मोर्चे निघत आहे. या मोर्च्याची अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि वर्षा बंगल्यावर मराठा नेत्यांची बैठक घेतली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. पण आजही मराठा समाजाचे प्रश्न जैसे थेच आहे. बहुंताश मराठा समाज शिक्षणापासून वंचित आहे. गावांमध्ये थोरला बंधू म्हणून वागायचं आणि आपल्या वेदना कशा मांडायच्या अशी अवस्था मराठा समाजाची झाली आहे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

‘बेहती गंगा में हात धो लो’ असं काही राजकीय नेते आता करत आहे. आम्ही काही कठोर निर्णय घेतले त्यामुळे नाराजांची फौज मोठी आहे. पण शेवटी हे सगळे प्रश्न मी आल्यामुळे निर्माण झाले नाही. मला अजून दोन वर्ष सुद्धा पूर्ण झाले नाही. आतापर्यंत अनेक मंत्री होऊन गेले त्यांच्यामुळे हे प्रश्न आजही प्रलंबित राहिले. आता आम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता हे करतांना उद्या मला कुणी हटवलं जाईल. पण माझ्या जागी दुसरा कुणी आला तरी लगेच हे होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा