हिंगोलीतही ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार, लाखोंच्या संख्येत मोर्च्याचा समारोप

September 17, 2016 4:19 PM0 commentsViews:

hingoli_updateहिंगोली, 17 सप्टेंबर : एक मराठा लाख मराठा ची साद घालत आज हिंगोलीत मराठा समाजानं भव्य मूक मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये महिला आणि विद्यार्थीनींची लक्षणीय उपस्थिती होती.

मराठवाड्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मूक मोर्चे काढल्यानंतर आज हिंगोली जिल्ह्यात मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच्या मोर्चांप्रमाणेच हिंगोलीत निघणार्‍या मोर्चातही लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील लोक सहभागी झाले होते आज सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हा परिषद मैदान आणि सिटी क्लबपासून ते तर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापाशी जाऊन विसर्जित झाला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप उघडपणे कुणीही या मोर्चांचं नेतृत्व स्विकारलेलं नाही. कोपर्डीतील घटनेचा निषेध करण्यासाठी या मोर्चांचं आयोजन केलं जात असल्याचंचं वारंवार ठसवलं जातंय. या मोर्चामुळे हिंगोलीतील सर्वच रस्ते लोकांनी फुलून गेलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा