ड्रोनमधून भोरगिरीचं सौंदर्य

September 17, 2016 6:25 PM0 commentsViews:

खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात उंच डोंगरावरून फेसाळत वाहणारा धबधबा,सह्याद्रीच्या कुशीतील चास-कमान धरणाचं मनोहक दृष्य डोळ्यांचं पारणं फेडण्यासाठी पुरेसं आहे. याच धरणांच्या चहुबाजुंनी विखुरलेल्या डोंगररांगांच्या कुशीतून खळखळ वाहणारे झरे इथलं निसर्गसौंदर्य अधिकल खुलवतायत.आपल्या कामधंद्यातून वेळात वेळ काढून सुट्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात. चास-कमान धरण एव्हाना तुडुंब भरलंय. या परिसरातील लहान मोठ्या फेसाळत वाहणार्‍या धबधब्यांचं दृष्य डोळ्यात साठवून ठेवावं एवढं सुंदर दिसतंय. नयनरम्य असा हा परिसर पावसांच्या जलधारांत न्हाऊन निघाल्यानंतर कसा नयनरम्य दिसतो ते ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने आम्ही चित्रण केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा