‘तिमिरातूनि तेजाकडे’चे प्रकाशन

April 17, 2010 6:12 PM0 commentsViews: 57

17 एप्रिलअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या तिमिरातूनि तेजाकडे या बीजग्रंथाचे प्रकाशन आज मुंबईत झाले. ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे, 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर पानसे यावेळी उपस्थित होते. हा ग्रंथ लोकार्पण सोहळा पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघात झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपूर्ण प्रवास आणि चळवळीचा आलेख या ग्रंथात मांडण्यात आला आहे. यानिमित्ताने पुस्तक प्रकाशाबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे आव्हान व उपाय या विषयावर परिसंवादही झाला.अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या संवेदनशील क्षेत्रात 20 वर्ष राहून त्या संदर्भात पुस्तक लिहिण्यामागची भूमिका दाभोळकर यांनी यावेळी सांगितली.

close