एकेकाळी पीसीओ चालवणार कपिल शर्मा आज किती कमावतो ?

September 17, 2016 7:26 PM0 commentsViews:

ट्विटगिरीमुळे कॉमेडियन कपिल शर्मा आज अडचणीत सापडला आहे. आपल्या नवीन ऑफिससाठी मुंबई पालिकेच्या अधिकार्‍यांनी 5 लाखांची  मागितल्याचे ट्विट कपिलने केले होते आणि पंतप्रधान मोदींना हेच का अच्छे दिन ? असा थेट सवाल केला होता. त्याची ही टिवटगिरी चर्चेचा विषय ठरला होता. आज तो प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असला तरीही एकेकाळी त्याला मुंबईत रहायला घर नव्हतं. आज आपल्या अंगभूत कौशल्यावर त्याने गरुड झेप घेतलीये.  फिल्मी स्टाईलमध्ये सांगायचे झाले तर त्याच्याकडे आज बंगला है,गाडी है, बँकबॅलेंस है…

कपिलनेच केलेल्या एका ट्विटनुसार, त्याने 3 वर्षांत 15 करोड टॅक्स भरला आहे. याचाच अर्थ कमीतकमी 80 करोड तरी त्याने कमवले असणारच. त्याच्या शोच्या लोकप्रियतेनेच त्याला टिव्हीचा सुपरस्टार बनविला आहे. बॉलिवूडच्या सगळ्याच मोठ्या ऍक्टर्सनी त्याच्या शोला भेट दिली आहे. एवढंच नाहीतर फोर्ब्सने त्याचे नाव 100 प्रभावी व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे आणि यावरुनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो.

कपिल एका शोसाठी 60 ते 80 लाख इतकी फी घेतो. बॉलिवुडच्या काही आघाडीच्या कलाकारांचीसुद्धा कमाई याहुन कमी आहे. तो आताच्या घडीला 10 मिलियन्सचा मालक आहे आणि त्याची स्वत:ची 50 लाख रु.किंमतीची रेंज रोवर कार आहे.

15 वर्षांचा असताना स्वखर्च भागविण्यासाठी तो पी.सी.ओ.मध्ये नोकरी करीत असे. तसंच घरखर्चाला मदत म्हणून मुलांचे ट्युशन घेत असे. त्याच्या वडलांचा 2004मध्ये कँसरमुळे मृत्यू झाला. वडलांच्या मृत्यूनंतर कपिलला हलाखीचे दिवस काढवावे लागले. अमृतसरमध्ये छोटे-छोटे कार्यक्रम करता करता कपिल मुंबईनगरीत पोहोचला. मुंबईत कपिलला इंडिया लाफ्टर चॅँलेंजमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. कपिलने अनेक तगड्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देत विजेतेपद मिळवलं.

अशाप्रकारे अनेक कार्यक्रम करता-करता तो छोट्या पडद्यावरचा कॉमेडी किंग बनला. टीव्हीच्या इतिहासात पहिला सुपरस्टार बनल्यानंतर त्याने आपला मोर्चा चित्रपटाक डे वळवला. गेल्यावर्षी ‘किस किस से प्यार करुं’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवुडमध्ये एंट्री केली.आणि
लवकरच त्याचा दुसरा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढंच नाहीतर कपिल अनेक जाहिरातींंमधून सुद्धा करोडो रुपये कमवत असतो. (Gettyimges)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा