आयपीएलवर बंदी घाला

April 19, 2010 8:17 AM0 commentsViews: 1

19 एप्रिलआयपीएलच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. विरोधकांनी आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली. सर्वच पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. आयपीएलचे राष्ट्रीयीकरण करावे, असे लालू प्रसाद यादव आणि डाव्यांनी म्हटले.तर आयपीएल हा स्वीस बँकेतील काळा पैसा पांढरा करून आणण्याचे माध्यम आहे, असा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला.भाजपला कोडींत पकडण्याचा प्रयत्नशशी थरूर यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेस भाजपला अडचणीत आणण्यासाठी रणनीती आखत आहे. कर्नाटकातील रेड्डी बंधूंच्या खाणकाम घोटाळ्याबद्दल काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. करुणाकरन आणि जनार्दन रेड्डी हे बेल्लारीतील खाणसम्राट राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या ओबालापुरम मायनिंगला सुप्रीम कोर्टात यापूर्वीच स्थगिती देण्यात आाली आहे.

close