रमेश रासकर यांची मुलाखत

September 17, 2016 8:20 PM0 commentsViews:

कोल्हापूर आणि नाशिकच्या दोन शास्त्रज्ञांना अमेरिकेतले प्रतिष्ठेचे पुरस्कार घोषित झालेत. ह्या दोन शास्त्रज्ञांची नावं आहेत रमेश रासकर आणि दिनेश भराडीया. रमेश रासकर हे नाशिकमध्ये जन्मलेले आहेत तर दिनेश भराडीया हे कोल्हापूरचे आहेत. दोघेही जण एमआयटीत
शास्त्रज्ञ आहेत. रासकर हे एमआयटीत असोसिएट प्रोफेसर आहेत. फेमटो फोटोग्राफीतलं रासकरांचं काम एवढं मोठं आहे की, जग कशा पद्धतीनं आपण बघणार यावर त्याचा परिणाम आहे. तर भराडीयांचं काम आहे रेडिओ सिग्नलसंदर्भात आहे. रमेश रासकर यांना पाच लाख डॉलरचा लेमलसन एमआयटी प्राईज जाहीर झालंय तर दिनेश भराडीयांना पॉल बॅरन यंग स्कॉलर अवॉर्ड घोषीत झालंय. रमेश यांनी अमेरिकेहून आयबीएन लोकमतच्या प्रेेक्षकांशी संवाद साधला..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा