छगन भुजबळांची प्रकृती खालावली, जेजे रुग्णालयामध्ये दाखल

September 17, 2016 8:49 PM1 commentViews:

bhujbal_arrested17 सप्टेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात कोठडीत असणारे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावलीये. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.

मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ ईडीच्या कोठडीत आहे. त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आलीये. छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भुजबळांना ताप आणि अंगावर चट्टे आले आहेत त्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. रक्त तपासणीनंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. याआधाही तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तसंच भुजबळ यांनी वारंवार तब्येतचे कारण देऊन जामीन मिळावा अशी विनंतीही केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Francis Bourne trading

    ashya bhrastacharyana ajibat sodu naka khoop maja keliy thode chatke pan sosayla hawet ata..