अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये मोठा स्फोट, 29 जखमी

September 18, 2016 1:04 PM0 commentsViews:

New york blast

18 सप्टेंबर :  न्यूयॉर्क शहराजवळील चेल्सिआमध्ये काल (शनिवारी) संध्याकाळी भीषण स्फोट झाला. यात 29 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा अद्याप कोणताही पुरावा सापडला नसल्याचं पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं.

स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गॅसगळतीमुळं हा स्फोट झाल्याचा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता; मात्र, पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली. स्फोट नक्की कशामुळं झाला, याचा तपास करत आहोत, असं पोलीस अधिकार्‍यांनी सांगितलं.

या घटनेमागे कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा पुरावा अद्याप सापडला नाही. ही प्राथमिक माहिती आहे, असं महापौर बिल डे ब्लेसिओ यांनी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा