ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचं निधन

September 18, 2016 1:35 PM0 commentsViews:

Nandu-Honap-Violinist-580x341

18 सप्टेंबर :  भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.

मुंबईतील एका संगीत कार्यक्रमात उपस्थित असलेल्या होनप यांच्या अचानकपणे छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर लगेचच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूवच्च त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

होनप यांनी अनेक भक्तीमय गाण्यांना संगीत दिले होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी कायम लक्षात राहण्यासारखी आहेत. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे गायक अजित कडकडे यांच्या आवाजातले हे गाणे होनप यांनी स्वतः संगीतबद्ध केले होते. तसंच त्यांनी गीतकार प्रवीण दवणे यांची असंख्य गाणी संगीतबद्ध केली होती. त्यांच्या या अकाली जाण्याने संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा